जळगाव (प्रतिनिधी)- येथील तांबापुरा भागामध्ये १२ सप्टेंबर रोजी झालेल्या हाणामारी प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एकास अटक केली आहे.
याबाबत भोलासिंग बावरी यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीत म्हटले होते की, रवी हटकर याने मला १२ सप्टेंबर रोजी भिला हटकर, गजानन हटकर, द.दा. हटकर, विजय हटकर, राजू हटकर आदींनी मारहाण केली होती, तसेच भोला सिंगच्या कुटुंबियांना देखील मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले होते. त्यानुसार एमआयडीसी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील फरार आरोपी रवींद्र राजू हटकर (रा. गवळीवाडा ) यास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यास २५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास सपोनि संदीप हजारे, रतिलाल पवार करीत आहे.