जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्र प्रभारी प्रियांका सानप यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना वाढत्या बेरोजगारी व वर्षांची २ कोटी नवे रोजगार या गंभीर प्रश्नांच्या बाबतीत बेरोजगारिवर निवेदन देण्यात आले.
युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत. दुचाकी रॅली काढत उत्तर महाराष्ट्र प्रभारी प्रियांका सानप यांनी मोदी सरकारवर टीका करीत देशात सर्वत्र तरुणांना बेरोजगार केल्याचे सांगितले. सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण करून देश विकायला काढला असा आरोप देखील त्यांनी केला.
जळगाव कॉग्रेस भवन येथून मेळावा संपल्यानंतर युवक काँग्रेस बाईक रॅली काढून विरोध प्रदर्शन करण्यात आले. या मोटारसायकल रॅली मध्ये युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यानकडून घोषणा देऊन परिसर दणाणला. मोटार सायकल घेऊन युवक काँग्रेस आक्रमक स्वरूपात दिसून आले. सध्या या कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे अनेक लोकांचे रोजगार गेलेत व बेरोजगारीचे भीषण संकट सद्या उभे राहिले आहे. सर्व बाबींना गांभीऱ्याने घेऊन व युवकांच्या भविष्य लक्षात घेऊन तात्काळ रोजगार निर्मिती करावी व युवकांना न्याय द्यावा. अशी मागणी जळगाव जिल्हा युवक काँग्रेस निवेदनात करण्यात आली आहे.







