पारोळा (प्रतिनिधी) – दिवसेंदिवस वाढत्या कोरोनामुळे तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असतांना, जनता जनार्दन मात्र कोरोना रोखण्याच्या नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पारोळा शहरात पाहवयास मिळत आहे. त्यामुळे पोलिसांनी अनेकांवर कारवाई केली आहे.

पारोळा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा पोलिसांनी नियम न पाळणारे व तोंडाला मास्क न लावणाऱ्यांवर आठवडाभरापासून कारवाईचा बडगा उचलला आहे .
पारोळा पोलिसांनी तोंडाला मास्क न बांधून फिरणाऱ्यां तब्बल १५० जणांवर कारवाई करत त्यांच्या कडून तीस हजार रुपयांची वसुली केली आहे, तर आजच्या बाजाराच्या दिवशी ३६ जणांवर कारवाई करत ७२०० ची वसुली केली आहे. पारोळा पोलिसांकडून कारवाई होत असताना जनतेला नियमांचे पालन करण्याचा सूचनाही दिल्या जात आहे. हवालदार इकबाल शेख, पो. हे. कॉ. सत्यवान पवार, ईश्वर पाटील, राकेश पाटील, दीपक अहिरे आदींनी कारवाई केली.







