जळगाव (प्रतिनिधी) – कानळदा येथून घरी येत असतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत मामुराबाद येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली, याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील ममुराबाद येथील रहिवाशी रईस हबीब शहा फकीर (वय-३८) हे भंगार जमा करण्याच्या व्यवसाय करतात. शनिवारी १९ सप्टेंबर २०२० रोजी दिवसभर व्यवसाय करून घरी येत असताना कानळदा-ममुराबाद रस्त्यावर रात्री ९ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी करण्यासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात ६ मुली, पत्नी, आई-वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे. तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पो.कॉ. ईश्वर लोखंडे करीत आहे.