नराधम पतीच्या मुसक्या आवळल्या ; जळगावातील महिला अत्याचार प्रकरणात मोठी कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) – जळगावातील महिला अत्याचार प्रकरणातील महिलेच्या पतीला रामानंद पोलिसांनी गुन्ह्याच्या काही तासांच्या आत गजाआड केले आहे. हा नराधम पुण्याहून जळगावात आला…स्वातंत्र चौकात बसमधून उतरला आणि पोलिसांच्या जाळ्यात फसला. मात्र, त्याचा मित्र अद्याप फरार आहे…
धुळे येथील माहेर असलेल्या एका 35 वर्षीय महिलेचा वाल्मिक नगरातील रहिवासी असलेल्या व्यावसायिकाशी विवाह झाला होता. छोटा व्यवसाय बंद असल्याने तिच्या पतीने मित्रासोबत भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू करण्याचे नियोजन केले मात्र, आपल्याच परिसरात लाज वाटत असल्याने मित्राच्याच घरी राहण्याचा निर्णय घेतला. त्या ठिकाणी या नराधमाने आपल्या व्यवसायात फायदा व्हावा म्हणून पत्नीला थेट मित्रासोबत शारीरिक संबध ठेवण्याची जबदरस्ती केली. नकार दिल्यास मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. 8 जूनला थेट कोल्ड्रींक्समध्ये काहीतरी पाजले पत्नीला शुद्ध नव्हती मात्र, समजत होते. अशा स्थितीत बाथरूममध्ये नेवून त्याने पत्नीला पकडून ठेवले व मित्राने अत्याचार केले. यानंतर महिलेला माहेरी सोडून गेला, 2 सप्टेंबरला ही अत्यंत धक्कादायक व नात्याला काळीमा फासणारी घटन उघडकीस आली. यानंतर रामनंद नगर पोलिीसात महिलेचा पती व त्याचा मित्र रमेश काकडे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
असा तपास आणि असा सापळा
18 रोजी रात्री हा गुन्हा दाखल झाला व त्याच्या काही तासात रामानंद नगर पोलिसांनी तपासची चक्रे फिरविली. यात आधी त्याच्या वाल्मिकनगरातील घरी पोलिसांनी चौकशी केली असता, हा नराधम शिरपूर किंवा पुणे अशी दोन वेगवेगळी ठिकाणे लोकांकडून सांगण्यात आली. मात्र, गुप्त माहितीच्या आधारे अखेर तो पुण्याला असल्याचे समोर आले. त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी रामानंद नगरचे एपीआय संदीप पदेशी व पथक जात असताना अचानक तो नराधम जळगावात येत असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली. या पथकाने बस थांबत असलेल्या स्वातंत्र चौकात सापळा रचला व या ठिकाणी तो उतरताच त्याच्या मुसक्या आवळल्या व गजाआड केले. त्याची विचारपूस सुरू आहे. त्याचा मित्र रमेश हा अद्याप फरार आहे. रविवारी दुपारी बारा वाजता एपीआय संदीप परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल भूषण पाटील, तुषार विसपूते, रुपेश ठाकूर, होमगार्ड निकम यांनी सापळा रचून ही कारवाई केली.