मुंबई (वृत्तसंस्था)- बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई पोलीस आणि मुंबईबाबत त्याचबरोबर बॉलीवूडमध्ये करण जोहर घराणेशाहीला पाठींबा देतो असं वक्तव्य केलं होत त्यामुळे तिच्या विरोधात टिकेची झोड उठली गेली. यात शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना असा कलगीतुरा चांगलाच रंगला होता. यावेळी भाजपने कंगनाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला होता.

यातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ७०वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त सोशल मीडियाद्वारे अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याने देखील मोदींना शुभेच्छा दिल्या होत्या. लक्षवेधी बाब म्हणजे मोदींनी या शुभेच्छांसाठी करण जोहरचे आभार मानले. मात्र यामुळे अभिनेत्री कंगना रणौतला आता ट्रोल केलं जात आहे.
दरम्यान सोशल मीडियावर नरेंद्र मोदींनी करण जोहरच्या ट्विटला रिप्लाय दिला. यावरून काही नेटकऱ्यांनी कंगनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. मोदींनी करणला रिप्लाय दिला पण कंगनाला नाही, अशा आशयाचा संदर्भ लावून ट्रोलर्सने सोशल मीडियावर कंगनाची खिल्ली उडवली आहे.







