जळगाव (प्रतिनिधी) – राजनंदिनी बहुद्देशीय संस्था जळगाव यांचेकडून प्रविण रमेश जाधव यांना त्यांच्या 24 वर्षाच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल शहरातील सुप्रसिद्ध विश्वविख्यात डॉ. महेंद्र काबरा यांचे सपत्नीक हातून आदर्श शिक्षक पुरस्कार, सन्मान पत्र, व फळ वृक्ष रोपे, प्रदान करण्यात आली. श्री. जाधव सर यांचे..सामाजिक, व शिक्षण क्षेत्रात असलेले कामं हे उल्लेखनीय तर आहेच. पण आपण माझे सोबत जळगावला फळगाव करण्यासाठी प्रयत्न करावा.वृक्ष लागवड करा हाच जळगाव करांचा व समस्त मानवाच्या कल्याणाचा मार्ग आहे. अशी भावना व्यक्त केली.









