नंदुरबार – भटके-विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र राज्य गृहमंत्री अनिल देशमुख,सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, व जिल्हाधिकारी नंदुरबार तसेव जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना या बाबतचे निवेदन देऊन भटके विमुक्त समाजाच्या भावना दुखावल्या बद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली.


निवेदनात म्हटले आहे की, भटके-विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र तर्फे मयत प्रेताची विटंबना करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. कोणतीही कारवाई न झाल्यास भटके-विमुक्त हक्क परिषद यांच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे ही सांगण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. खांदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पुरुषोत्तम काळे ( प्रदेश मुख्य संघटक) रामकृष्ण मोरे रावसाहेब( नंदुरबार जिल्हाध्यक्ष), रवींद्र गोसावी( नंदुरबार जिल्हा युवा आघाडी प्रमुख), वरुणबाबा भारती( युवा आघाडी शहर प्रमुख) उपस्थित होते.
सदर घटनेचा भटके-विमुक्त समाज व दशनाम गोसावी समाज यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.







