अॅग्लो उर्दु हायस्कुल संस्थेचे सचिव अमिन बादलीवाला यांनी क्रीडा शिक्षकांचा सत्कार प्रसंगी प्रतिपादन केले
जळगाव (प्रतिनिधी) – आदर्श शिक्षक हे विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यात नेहमी अग्रेसर असतात.तसेच आदर्श शिक्षकांचा गौरव करून देश समाजाला सुसंस्कृत बनविण्याचे काम त्यांच्या हातून होत असल्याचे अॅग्लो उर्दु हायस्कुल संस्थेचे सचिव अमिन बादलीवाला यांनी क्रीडा शिक्षकांचा सत्कार प्रसंगी प्रतिपादन केले.अंजूमन तालिमुल मुस्लेमिन संचलित एम.ए.आर.अॅग्लो उर्दू हायस्कूल व ज्यु. कॉलेजमध्ये मान्यवरांचा सत्कार सोहळा सोशल डिस्टेन्सिंग व मास्क तसेच सॅनिटायझरचा वापर करून पार पाडला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अब्दुल गफ्फार मलीक हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष सैय्यद चांद सैय्यद अमीर, प्रेमाबाई जैन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जाकिर हुसेन, नाजिम मलीक शाळेचे मुख्याध्यापक श्री.जुबेर, जिल्हा क्रीडा महासंघाचे सल्लागार व राष्ट्रीय खेळाडू प्रा.हाजी इकबाल मिर्झा व शिक्षक वृद व्यासपिठावर उपस्थित होते.
श्री.बादलीवाला पुढे म्हणाले की, विद्यार्थी यांनी आपल्या शरीराची काळजी घेत नेहमी व्यायाम करावे, सध्या कोरोनाकाळात मैदाणी खेळ बंद असल्याने विद्यार्थ्यांनी घरच्या घरी व्यायाम करावे व तसेच क्रीडा शिक्षकांनी स्वत:ची काळजी घ्यावी.शिक्षकांचा सन्मान हा म्हणजे त्यांच्या कार्याचा सन्मान होय. असे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अब्दुल गफ्फार मलीक यांनी सांगितले की, क्रीडा शिक्षकांवर शाळेची जबाबदारी सर्वाधिक असते. असे सांगून शिक्षकांना प्रेरणा दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य डॉ. शेख बाबू यांनी केलेल्या पत्रकारितेला देशाच्या विकासाचा चौथा स्तंभ सांगून पत्रकारांना प्रेरणा दिली.
या शिक्षकांचा झाला सत्कार
मुजावर शाकिर (जळगाव मनपा उर्दू शाळा, राज्य शिक्षक पुरस्कृत), सैय्यद जुल्फेकार व साजिद मिर्झा (पत्रकारितेसाठी),प्रविण वसंत पाटील ( जि.प. आदर्श शिक्षक,जळगाव),डॉ.प्रदिप तळवेलकर ( महाराष्ट्र राज्य शा.शि. महामंडळ राज्य कोअर कमिटी सदस्यपदी),प्रा.डॉ. रणजित पाटील (महाराष्ट्र राज्य शा.शि. महामंडळ युवा कोअर कमिटी सदस्यपदी)
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शफिक सिद्दिकी यांनी तर आभार उपप्राचार्य शेख मोहंमद फारूक अमीर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी जिल्हा क्रीडा महासंघाचे सल्लागार व राष्ट्रीय खेळाडू प्रा.हाजी इकबाल मिर्झा व प्राचार्य तसेच शिक्षकवृंद यांनी परीश्रम घेतले.