मनवेल ता.यावल (वार्ताहर ) येथुन जवळच असलेल्या थोरगव्हाण येथील ४८ वर्षीय शेतकऱ्यांने विषारी पदार्थ सेवन करुन आत्महत्या केल्याची घटना दि.१२ रोज शनीवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
संभाजी सुकलाल पाटील वय ४८ या शेतकऱ्यांने नापीकतेला कंटाळून घरी कुणी नसल्याने विषारी पदार्थ सेवन करुन जीवन संपविले.पत्नी घरी आल्यावर ते अंत्यअवस्थेत दिसुन आले. याबाबत पोलीसांना माहिती देऊन यावल ग्रामीण रुग्णालयात आणले असता तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाला होता. त्याचा पत्शात आई वडील पत्नी मुलगा असा परीवार आहे.यावल पोलीस स्टेशनला योगराज पाटील यांनी दिलेल्या खबरी वरुन अकस्मात मृत्यू ची नोद करण्यात आली असुन पुढील तपास हवालदार सिंकदर तडवी करीत आहे.