महसुल पथकाची धडक कारवाई
पारोळा (प्रतिनीधी) – महसुल पथकाने प्रांताधिकारी विनय गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली दि. 12 रोजी राञभर जागुन बोरी नदी पाञातुन एक-एक ब्रास वाळूने भरलेले पाच ट्रक्टर बोळे शिवारातुन पारोळा शहराकडे येताना जप्त केले.
पारोळा तहसिलदार अनिल गवांदे, शहर तलाठी निशिकात माने,प्रविण शिंदे,भैय्या निकम,अकोलनेरकर,जी.एस पाटील,कैलास माळी,महेंद्र पाटील यांनी संपुर्ण राञभर तालुक्यातील सर्व नदीपात्रांवर फिरून गुप्त माहीती द्वारे मौजे करमाड येथुन ट्रक्टर येणार असल्याची माहीती मिळताच सदर पथकाने शिताफीने सर्व वाहने ताब्यात घेतली असुन सर्वांना प्रत्येकी दंडाची नोटीस दिली जाणार असलेचे तहसिलदार यांनी सांगितले.सदर कारवाईने अवैध वाळू व्यवसायीकांचे धाबे दणाणले असुन याप्रमाणेच कारवाईत सातत्य असल्यास शासनास मोठ्या प्रमाणावर महसुल मिळू शकतो. वाळू चोरट्यांनी तालुक्यात उच्छाद मांडला असून
तहसिलदार गवादे आणि शहर तलाठी निशिकांत माने यांच्या टीम ने केलेल्या कारवाई मुळे जणमाणसात समाधान व्यक्त केले जात आहे. भविष्यातही अवैध वाळू व्यावसायिका वर अशीच धडक कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.