यावल (प्रतिनिधी) – माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यासह यावल तालुक्यात गट विकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, ता. आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य पथक घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात येऊन ही मोहीम राबविण्यात येत आहे. दहिगाव येथे डॉ. गौरव भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच साजिया तडवी यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आरोग्य विभागातील राजेंद्र बारी,अनिता नेहते आदी उपस्थित होते.



मोहिमेची पहिली फेरी दि.१२ सप्टेंबर ते १० ऑक्टोंबर २०२० पर्यंत एकूण २५ दिवस आहे. तसेच मोहिमेची दुसरी फेरी दिनांक १२ ऑक्टोंबर ते २४ ऑक्टोंबर २०२० एकूण १२ दिवस आहे. या कालावधीत मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेत आशा सेविका, अंगणवाडी सेविका, व ग्रामपंचायत कर्मचारी असे आरोग्य पथक ( टीम) तयार करण्यात आले असून हे पथक घरांना भेटी देऊन घरातील व्यक्तींचे व ५० वर्षावरील व्यक्तींचे तापमान जास्त (ताप १००.४ अंश फँ. किंवा जास्त) व ऑक्सिजन लेवल कमी ( SPO2 ९५% पेक्षा कमी) असे व्यक्ती आढळल्यास त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे संदर्भित करण्यात येणार आहे. तसेच तीव्र श्वसनाचे आजार ( SARI ) आणि फल्यू सदृश्य आजार ILI रुग्ण आढळल्यास कोविड चाचणी व उपचार करण्यात येणार आहेत.
दहिगाव येथे भेटीदरम्यान तापमान जास्त, ऑक्सीजन लेव्हल कमी, खोकला, आणि इतर लक्षणे असणाऱ्या, व कोमॉरबिड रुग्ण आढळलेल्या व्यक्तींना संदर्भित करण्यात आले.
मोहीम यशस्वितेसाठी आरोग्य विभागातील राजेंद्र बारी, अनिता नेहते, आशा सेविका नीता महाजन, अर्चना मेढे, संध्या बाविस्कर, पुष्पा पाटील, भाग्यश्री महाजन, अंगणवाडी सेविका मंगला महाजन, मंदाकिनी पाटील, शकुंतला पाटील, छाया अडकमोल, मंगला तेली, विजया महाजन व ग्रामपंचायत कर्मचारी आदी परिश्रम घेत आहेत.







