पारोळा (प्रतिनिधी) – पारोळा व्यापारी महसंघाच्या वतीने कोरोना महामारीच्या काळात ज्या ज्या समाजसेवी संस्था सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीनी या कोविड १९ च्या महामारीत कार्य केले त्या सर्वांचे पारोळा व्यापारी महासंघाच्या वतीने कोरोना योध्दा म्हणुन सन्मान करण्यात येत आहे. या अनुषंगाने पारोळा येथिल राष्ट्रीय संस्व संघ याचा सर्व कार्यकर्त्याचा तसेच संपुर्ण देशात लाकडाॅऊन झाल्यापासुन अविरत सेवा देणारे पारोळा येथिल जैन युवक मंडळ यांचा आज पारोळा येथिल सिंधी मंगल कार्यलयात सन्मान करण्यात आला,यावेळी सन्मान उत्तर देताना अॅड,दत्तात्र्य महाजन यांनी आपल्या मनोगतातुन रा,स्व,सघांची भुमिका स्पष्ट केली रा,स्व,संघा हा कोणत्याही स्वार्था शिवाय भारत मातेची सेवा करित असल्याचे सांगीतले तर या वेळी रावसाहेब भोसले यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.

पारोळा जैन युवक मंडळाच्या वतीने उमेश जैन यांनी व्यापाऱ्यांची लाॅकडाऊनच्या काळातील व्यथा सांगितली व व्यापार्यानी एकजुट व संघटीत राहावे,तसेच फक्त व्यापार न पाहाता आपण ही समाजाचे काही देणे लागतो म्हणुन पारोळा व्यापारी महासंघाने पारोळा येथिल कुटरी रूग्णालयास काही मशिनरी घेऊन लोकार्पण केल्या त्याबद्दल या सर्व व्यापारी बांधवाचे आभार मानले,तर शेवटी महासंघाचे अध्यक्ष केशव क्षत्रिय यांनी आभार मानत थोडक्यात व्यापार्याना मार्गदर्शन करित सांगीतले कि जिवनात पैसा सर्वकाही नाही तर जीव म्हत्वाचा आहे,म्हणुन सर्व लाहान-मोठ्या स्वसायिकांनी स्वतासह ग्राहाकांची काळजी घ्यावी व शासनाच्या नियमा नुसार सोशल डिस्टंन्ट ठेऊन व्यापार करावा नेहमी माॅस्क चा वापर करा सॅनिटायचर वापरा, असा मोलाचे मार्गदर्शन केले,या प्रसंगी रा,स्व,सघांचे कार्यकर्ते,जैन युवक मंडळाचे सदस्य तसेच व्यापारी महासंघ चे उपाध्यक्ष अशोककुमार लालवाणी,विलास वाणी,मनोहर हिंदुजा,रोशन शाह,आकाश महाजन,महेश हिंदुजा, गोपाल दाणेज,अमृत क्षत्रिय,तसेच शहरातील व्यापारी बांधव उपस्थित होते.







