पारोळा (प्रतिनिधी) – राष्ट्रीय सिंधी मंचच्या प्रदेश उपाध्यक्षपदी पारोळा येथिल सामाजिक कार्यकर्ते पारोळा सिंधी समाज अध्यक्ष यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली ही निवड राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रोशनलाल उतवानी यांनी केली.

याबाबत अधिक असे संपुर्ण भारततील सिंधी समाजाला एक करण्याच्या उद्देशाने मध्यप्रदेश मधील भोपाल येथे राष्ट्रीय सिंधी मंचची स्थापना २०१३ मध्ये करण्यात आली आहे या राष्ट्रीय मंचचा उद्देश एकच आहे की, संपुर्ण देशात विखुरलेला आपला समाज हा कोणत्या तरी माध्यमाने एक व्हावा समाजातील रूढी परंपरा ह्या जिंवत राहाव्यात तसेच आपली भाषा व संस्कृती जी दिवसे दिवस लोप पावत चालली आहे ही टिकावी म्हणुन या राष्ट्रीय सिंधी मंचची स्थापना करण्यात आल्याचे प्रदेश उपाध्यक्ष अशोककुमार लालवाणी यांनी सांगीतले या मंचने संपुर्ण देशात प्रत्येक राज्याची वेगवेगळी कार्यकारणी करून येथिल युवकांना प्रशिक्षीत करून आपली संस्कृती व भाषा टिकवण्याचे आहावान केले आहे. महाराष्ट्राच्या कार्यकारणीची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे,यात अध्यक्षपदी संजय कृपलानी,चेंबुर मुबंई तर महाराष्ट्रासाठी चार उपाध्यक्षकाची घोषणा करण्यात आली आहे,यात अशोककुमार लालवाणी,पारोळा,कुदंनलाल रावलानी औरंगाबाद,रामकुमार लालवाणी गोंदिया,इंदरलाल कन्हैयालाल पमनानी पुणे,तर प्रदेश महासचिवपदी विनोद जेठानी नागपुर,प्रदेश सचिव -घनश्याम मुलचंदानी चंद्रपुर,प्रदेश-संगठन मंत्री निकी बत्रा भुसावल,प्रदेश संस्कृतिक सचिव-नरेश मंगलानी जळगाव,प्रदेश मिडीया प्रभारी-अनिल केवलरामानी अमरावती,प्रदेश प्रवक्ता जवाहर कोटवानी पुने पिंप्री,प्रदेश कार्यकारणी सदस्य-डाॅ,मदनलाल बलराम जसवानी बिड,नारायण जेठवानी चालिसगाव,नेमीचंद निहलानी संगमनेर,अशोक तलरेजा नासिक,झामदास सैनानी अमळनेर, कन्हैयालाल फुलवाधवा तुमसर,दिपक मेंघवानी परतवाडा,आनंदकुमार वरयानी जालना,डाॅ,भगत राम धुळे,भगतराम ठकरानी गोंदिया,अशी २१ जणाच्यां कार्यकारणीची घोषणा राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रोशनलाल उतवानी यांनी केली आहे,या निवडी बद्दल अशोककुमार लालवाणी यांचा अनेक स्तरावरून अभिनंदन होत आहे,पारोळा व्यापारी महासंघाच्या वतीने अशोककुमार लालवाणी यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यत आल्या.







