जळगाव ( प्रतिनिधी) येथे मध्यरात्री जळगाव जिल्हा कोव्हीड रुग्णालयात वार्ड. क्र. 6 मध्ये पहुर येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने आत्महत्या केली असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे जळगाव जिल्हा कोव्हीड रुग्णालय पुन्हा वादाच्या चर्चेत आले आहे.

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जळगाव जिल्हा कोविड रुग्णालयातील वाॅर्ड क्र. ६ मध्ये कडुबा नकुल घोंगडे वय 50 रा. पहूर ता. जामनेर या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली आहे. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून एक ते दीड तास म्रुतदेह लटकलेला होता, असे परिसरात सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे रुग्णालयात कर्मचारी कुठे होते. हा देखील मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. आज पुन्हा जळगाव जिल्हा कोव्हीड रुग्णालय चर्चेत आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.







