जळगाव (प्रतिनिधी) – आव्हाणे नदीपात्रातून जाणारा शेतरस्ता वाळू उपसा करणार्या डंपर चालकांनी तोडून टाकल्याने संतप्त शेतकर्यांनी दि.9 रोजी गिरणा नदीपात्रातच बसून हर्षल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जलसत्याग्रह केले होते.विविध मागण्यासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारची पुर्व सुचना न देता तसेच कोरोना विषाणू संसर्ग व प्रार्दुभाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या शासकीय आदेशाचे उल्लघंन केल्याने आंदोलनकर्त्याविरूध्द तालुका पोलीस स्टेशनला दि.10 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुका पोलीस स्टेशनचे पो.ना. प्रितम पिंताबर पाटील यांच्या फिर्यादिवरून नदीपात्रातून चोरीचा वाळू उपसा बंद व्हावा, वाळू वाहतक करणारे ट्रॅक्टरमुळे रस्ते खराब झाले असून पाळधी शिवारातील शेतकर्यांची गिरणा नदीपलीकडेच शेती असून त्या शेतांकडे जाण्यासाठी वाळू वाहतूक करणार्या डंपर चालकांनी तोडून टाकले आहे.तसेच गावातील तलाठी व तहशिलदार यांचे निलंबन करावे अशा विविध मागण्यासाठी हर्षल प्रल्हाद चौधरी व त्यांच्या सोबत विठ्ठल जानकीराम पाटिल, निवृत्ती भगवान चौधरी,नवल शालीक पाटील,आधार आनंदा पाटील, चंद्रकांत दिलीप चौधरी, रविंद्र दिलीप चौधरी,संजय सुभाष पाटील, जगदिश धनसिंग चौधरी, प्रणिलसिंह चौधरी सर्व राहणार आव्हाणे यांनी कोणत्याही प्रकारची पुर्व सुचना न देता नदिपात्रातील पाण्यात धरणे आंदोलन करून शासनाचे कोरोना विषाणू संसर्ग व प्रार्दुभाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या शासकीय आदेशाचे उल्लघंन केल्याने आंदोलनकर्त्याविरूध्द तालुका पोलीस स्टेशनला दि.10 रोजी गु.र.न. 3072/20 भादवी कलम 188,269,270 प्रमाणे तसेच साथीचे रोग प्रतिबंध कायदा कलम 2,3,4, व महाराष्ट्र पोलीस अधि.कलम 37 (1)3 चे उल्लघंन कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास साहेबराव पाटील करीत आहे.








