जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाची धोका पूर्व पातळी 213 मीटर असून आज 10 सप्टेंबर रोजी धरणाची पाणी पातळी 213.00 मीटर इतकी आहे. हतनूर धरणाच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा हतनूर पाटबंधारे प्रकल्पाचे उपअभियंता श्री महाजन यांनी दिला.
दिनांक 10 रोजी धरण क्षेत्रात पावसला सुरूवात झालेली असून पुढील 72 तासांमध्ये तापी नदी पात्रात हतनूर धरणांमधून अचानक पाणी प्रवाह सोडण्यात येऊ शकतो.
तरी पुढील 72 तासापर्यंत हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदी पात्रांमध्ये कुणीही गुरेढोरे सोडू नये अथवा कोणी तापी नदीपात्रामध्ये जाऊ नये. असे हतनूर पाटबंधारे प्रकल्पाचे उपअभियंता श्री महाजन यांनी कळविले आहे.