बीड (वृत्तसंस्था)- जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चालला आहे. रोज नविन आणि कोरोनाग्रस्तांच्या सहवासातील रूग्ण वाढतच आहेत. ग्रामिण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर रूग्णांची वाढ चिंताग्रस्त होत चालली आहे. काल 898 स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यात 166 जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. कोरोनाबाधितांचा आकडा 5194 वर पोहचला आहे.
बुधवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा 166 नवे रूग्ण सापडले. बीड जिल्ह्यामध्ये काल एका दिवसात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा एकुण आकडा 5194 एवढा झाला आहे. आतापर्यंत 3977 रूग्ण बरे झाले आहेत. तर 1760 जण उपचार घेत आहेत. गुरूवारी 115 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रिकव्हरी रेट 67.25 एवढा आहे. बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 177 जणांचा मृत्यू झाला आहे. डेथ रेट 2.99 एवढा आहे.