
जळगाव [प्रतिनिधी] – महापालिकेंतर्गत गटारीचे काम करणाऱ्या मजूराचे सोबत काम करणाऱ्यांसोबत किरकोळ करणावरून शाब्दिक चकमक झाल्याने संतापाच्या भरात एका मजुराच्या हातावर लोखंडी पट्टीने वार करून त्याला जखमी केल्याची घटना दि.9 रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास जळगावातील बजरंग बोगद्याजवळ घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे.
गटाराचे काम करणारा सचिन रविंद्र बाविस्कर (वय-२५) रा. आसोदा रोड वाल्मिक नगर हा महानगरपालिकेच्या ठेकेदाराकडे सेंटींगचे काम करतो. जळगावातील बजरंग बोगद्याजवळ गटारीचे काम करण्यासाठी सचिन गेला होता. सकाळी १० वाजेच्या सुमारास त्याच्या सोबत काम करणारा मजूर किशोर (पुर्ण नाव गाव माहिती नाही) यांच्यासोबत कामावरून शाब्दिक चकमक झाली. यात किशोरने संतापाच्या भरात हातात लोखंडी पट्टीने सचिन बाविस्करच्या डाव्या हातावर वार करून जखमी केले. जखमी सचिन बाविस्कर यास पोलीसांनी प्राथमिक उपचारासाठी शिरसोली रोड जवळील देवकर कॉलेज मधील जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.







