जळगाव [प्रतिनिधी] – जळगाव शहरातील वाल्मिक नगरातील आसोदा रोडवरील पान टपरी चोरट-यांनी फोडून दुकानातील किरकोळ माल लंपास केल्याची घटना दि.9 रोजी सकाळी उघडकीस आले. ही पान टपरी १५ दिवसात तिसऱ्यांदा फोडली आहे. शनीपेठ पोलीस ठाण्यात चोरट-यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
टपरी चालक, भरत चंपालाल दरडेकर (वय-२७) रा. वाल्मिक नगरजवळ हरी ओम नगर यांची आसोदा रोडवरील रेल्वे फाटकाजवळ पान टपरीचे दुकान आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पान टपरी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे ८ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता पान टपरी बंद केली. मध्यरात्री चोरट-यांनी पान टपरी फोडून दुकानातील कुर कुऱ्यांचे पाकीट आणि लहान फ्रिजचे नुकसान करून फ्रिजमधील पाण्याच्या बाटल्या लंपास केल्या. सकाळी दुकान उघडण्यासाठी गेल्यानंतर पान टपरीत चोरी झाल्याचे दिसून आले. शनी पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.








