जळगाव ( क्रीडा प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य क्रीडाशिक्षक महासंघ राज्य कोअर कमिटीत जळगाव जिल्हा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ प्रदिप तळवेलकर यांची निवड झाल्याबद्दल तसेच जळगाव जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे सहसचिव प्रविण पाटील यांना “जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक” पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल जिल्हा क्रीडा महासंघातर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कार करतांना जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे सचिव राजेश जाधव, उपाध्यक्ष प्रशांत जगताप, सहसचिव प्रविण पाटील,राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा डॉ रणजित पाटील व प्रा.वसीम मिर्झा आदी उपस्थित होते.