जळगाव (प्रतिनिधी) – आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दि. ७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी (महसुल) रविंद्र भारदे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) शुभांगी
भारदे, नायब तहसिलदार (गृह) रविंद्र मोरे, अव्वल कारकून नम्रता नेवे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी
उपस्थित होते.