पारोळा (प्रतिनिधी) – आज दुपारी 2 वाजता 3 सख्ख्या बहिणी आपल्या आई सोबत कपडे धुण्यासाठी पारोळा – धरणगाव रस्त्यावरील पोपट तलावाच्या खदानीत गेल्या होत्या यावेळी कपडे धुण्यासाठी वापरात येणारी लाकडी मोगरी पाण्यात वाहू लागल्याने तिला काढण्यासाठी 2 बहिणीने प्रयत्न केला असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडाल्या त्यांना वाचवण्यासाठी आई व तिसऱ्या बहिणीने प्रयत्न केला असता, त्यात त्या सुद्धा थोडक्यात वाचल्या.

याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ आसिफ कुरेशी,जुबेर शेख यांनी माहिती दिली की मोल मजुरी करणारे शेख रशीद हे शेतात कामावर गेले होते यावेळी त्यांची पत्नी सायराबाई मुलगी आशियाबी शेख रशीद 17 ,गुलनाजबी 15 व रुखसार 11 हे सर्व पोपट तलावाच्या वाहत्या पाण्यात कपडे धुण्यासाठी गेले होते, यावेळी दि. 4 रोजी पारोळा शहरात जोरदार पाऊस झाल्यामुळे पोपट तलाव व खदान परिसरात पाण्याचा मोठा साठा झाला होता यावेळी कपडे धुता धुता अचानक लाकडी मोगरी हातातून सरकून पाण्यात वाहू लागल्याने गुलनाजबी हिने ती काढण्यासाठी पुढे पाऊल टाकताच ती पाण्यात बुडू लागली तिला वाचवण्यासाठी रुखसार ही पुढे सरसावली असता ती ही पाण्यात बुडाली यावेळी त्यांची आई सायराबाई हिने पळत जाऊन जवळच्या नगरसेवक कैलास चौधरी यांच्या स्टोन क्रेशर वरील मजुरांना आरोळ्या मारीत बोलावले यावेळी तिसरी बहीण आशियाबी 17 ही देखील पाण्यात बुडत असताना भैय्या चौधरी ,गोलू चौधरी आदींनी तिला वाचवले, दरम्यान पाणी जास्त असल्याने गुलनाजबी व रुखसार यांचा मात्र पाण्यात बुडून मृत्यू झाला होतो. पारोळा, प्रभाग 4 मध्ये शोककळा पसरली यावेळी काही अव्वल पोहणाऱ्या तरुणांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले.
रुग्णालयास यात्रेचे स्वरूप-
अत्यंत गरीब परिस्थिती असलेले शेख रशीद यांच्यावर कोसळलेल्या गंभीर घटनेचे वृत्त कळताच आझाद चौक, कुरेशी मूहल्ला, भागातील नागरिकांनी कुटीर रुग्णालयात एकच गर्दी केली होती यावेळी खा उन्मेष पाटील नगराध्यक्ष करणं पवार, नगरसेवक पी जी पाटील दीपक अनुष्ठान,डी बी पाटील,भीमराव जावळे यांनी भेटी देऊन कुटुंबाचे सांत्वन केले. याबाबत पारोळा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद होउन तपास प्रकाश चौधरी,विजय भोई करत आहे.







