जळगाव (विशेष प्रतिनिधी)- दि. 5 सप्टेंबर शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. राज्यातील प्राथमिक, माध्यमीक व महावीद्यालय गटातील त्यातील शैक्षणिक सेवेतील तळमळ पाहून सर्व राजपुत समाज बांधवांच्यावतीने प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन या तीनही विभागातील तीन शिक्षक बांधवांना समाज बांधवांच्यावतीने शिक्षक रत्न म्हणून सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि प्राध्यापक सन्मानित करण्यात आले.त्यात प्रा.उमेश पाटील यांना क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
राजपुत समाजातर्फे समाजातील प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन विभागातील शिक्षकांचा गौरव करण्यात आला.त्यात प्राथमिक विभागात पाचोरा तालुक्यातील लोहटारचे शिक्षक भरत विठ्ठल पाटील यांचा उत्कृष्ट लेखक म्हणून तर माध्यमिक विभागात सटाणा येथील जोगेश्वरी माध्यमिक विद्यालय मुंबईचे शिक्षक महेंद्रसिंग ठोके तसेच महाविद्यालय विभागात व्ही.एस.नाईक महाविद्यालय रावेरचे क्रीडा शिक्षक प्रा.उमेश नारायण पाटील यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल या तिघा शिक्षकांचा गौरव करण्यात आला.








