पुणे (वृत्तसंस्था) – गोळीबार मैदानाजवळील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे.याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दल आणि पोलीस दाखल झाले आहेत.

माहितीनुसार, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालायात आयसीयू वार्डमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पुणे – गोळीबार मैदानाजवळील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे.याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दल आणि पोलीस दाखल झाले आहेत.