जळगाव (विशेष प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा कहर सुरूच असून आज दि. ३ रोजी ७५३ नवीन रूग्ण आढळून आले आहे.यात सर्वाधीक ११५ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. तर पारोळा ९६, अमळनेर-८७ रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या २९ हजार ६८६ वर पोहोचला आहे.

तालुकानिहाय रुग्ण:- जळगाव ग्रामीण-१९; भुसावळ-५०; पाचोरा-२६; भडगाव-४२; चोपडा ७४; धरणगाव-२७; यावल-३८; एरंडोल-०९; जामनेर-३८; रावेर-१४; चाळीसगाव-५८; मुक्ताईनगर-२७; बोदवड-१८ व बाहेरच्या जिल्ह्यातील ५ रूग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्यात गुरुवारी ५१३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आजवर या विषाणूला हरविणार्या रूग्णांचा आकडा २१ हजार ३४३ पोहोचला असून, दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मृतांची संख्या ८४० इतकी झाली आहे. कोरोनाचा कहर थांबता थांबेना ! याबाबत जिल्ह्यात चर्चा सुरु आहे.







