यावल [ प्रतिनिधी ] तालुक्यात यावल – चोपडा रोडवर चुंचाळे फाट्याजवळ झालेल्या अपघातात जळगाव येथील मयूर कॉलनीतील मुकेश लोटन सोनार हा जागीच ठार झाला तर त्याच्यासोबत असलेल्या रमेश बळीराम सोनार हा जखमी झाल्याची घटना आज सकाळी दहा वाजेच्या दरम्यान घडली.
हे दोघे आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच.19.Q. 2989 वरून यावल कडे येत असताना मोटर वाहन 407, मालवाहतूक MH.19.4100 याने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात मुकेश लोटन सोनार हे जागीच ठार झाले तर त्याच्या सोबत असलेले रमेश बळीराम सोनार हा जखमी झाला आहे. मयत मुकेश सोनार यांना शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणले असून जखमीवर यावल ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार सुरु आहे. याबाबत यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. पुढील तपास यावल पोलीस करीत आहेत. मयत मुकेश सोनार यांच्या पश्चात आई,वडील, पत्नी,मुलगा असा परिवार आहे. सादर सोनार हे जळगावात सराफ बाजारात सोनारी व्यवसाय करीत होते. घटनास्थळी यावेलचे सोनार समाजाचे अधक्ष नितीन सोनार यांची तातडीची मोलाची मदत मिळाली.