पातोंडा – अवर्षणप्रवण क्षेत्रात असणाऱ्या व सतत दुष्काळाने होरपळनाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरूपी मिटावा यासाठी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांचे शिवनेरी फाउंडेशनच्या सहकार्याने भूजल अभियानांतर्गत चाळीसगाव तालुक्याचे भूमिपुत्र डॉ.उज्वलकुमार चव्हाण यांच्या मिशन ५०० कोटी लिटर्स जलसाठा या संकल्पनेतून पातोंडा येथील टाकेश्वर महादेव येथे नालाखोलीकरण कामाचा शुभारंभ शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार मंगेश चव्हाण, आयकर सह-आयुक्त डॉ.उज्वलकुमार चव्हाण, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, पातोंडा गावाचे सरपंच बापू माळी, नगरसेविका तथा अभियानाच्या जलयोध्या श्रीमती सविताताई राजपूत, जलयोद्धे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तुषार निकम, रांजणगाव चे सरपंच शेखर निंबाळकर, दयाराम सोनवणे, सोमनाथ माळी, माळतकर सर, यांच्यासह खरजई चे माजी सरपंच मधुकर एरंडे, सतीश मुलमुले, देविदास पाटील, जयराम झगडे, राजेंद्र उखडले, संजय उखडले, नानाभाऊ माळी, प्रकाश झगडे, अशोक झगडे, संजय माळी यांच्यासह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सामाजिक संस्थांचे सहकार्य व ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून होणार नालाखोलीकरण
शिवनेरी फौंडेशन संचलित भूजल अभियान अंतर्गत मिशन ५०० कोटी लिटर्स जलसाठा हे अभियान चाळीसगाव तालुक्यातील ५७ हून अधिक गावात विविध माध्यमातून राबविले जात असून त्यातील नालाखोलीकरण करण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण व विविध सामाजिक संस्था यांच्या तर्फे पोकलेन मशीन मोफत दिले जाणार आहे. यात गावातील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने डीझेल टाकून आपापल्या शेताजावळील नाले खोलीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आपल्या शिवारात मोठ्या प्रमाणात काम झाले पाहिजे, म्हणून बहुसंख्य शेतकरी आग्रही आहेत. त्याच बरोबर आपण करीत असलेले काम हे शास्त्रोक्त पद्धतीने बरोबर असावे, यासाठी भूजल टीम चाळीसगाव ने पातोंडा शिवाराची एक शिवारफेरी केली. याशिवाय फेरीत माथ्यापासून पायथ्यापर्यंत जलसंधारणाची कामे कसे करता येतील, त्याचबरोबर आपण करत असलेली कामे शास्त्र आणि शिस्तीला धरून बरोबर आहेत का? हे समजून सांगितले. आपल्या शिवारामध्ये ज्या ज्या ठिकाणी मशीन काम आपल्याला करून घ्यायचे आहे, त्या ठिकाणाची पाहणी करून, कोणती उपचार पद्धती इथे करता येईल, आणि त्याचा उपयोग किती शेतकऱ्यांना होईल. याचे शास्त्र या शिवारफेरी मधून पातोंडा शिवारातील शेतकऱ्यांनी समजून घेतले.