धुळे (वृत्तसंस्था) – येथील धुळे एज्युकेशन सोसायटीच्या मा.ध.पालेशा वाणिज्य महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.चंद्रशेखर वाणी यांची अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या महाराष्ट्रराज्य कार्यकारणीच्या मिडिया प्रकोष्ठ सदस्य म्हणून अभिनंदनीय निवड झाली आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेशाची झुम ऐप वर मीटिंग झाली त्यावेळी एन-मुक्ताचे अध्यक्ष व जळगाव विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राध्यापक नितीन बारी यांनी प्रा.डॉ. चंद्रशेखर वाणी यांचे अ.भा.रा. महासंघाच्या महाराष्ट्रराज्य मिडिया प्रकोष्ठ साठी नाव सुचविले. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा.डॉ.प्रदीप खेडकर यांनी मान्यता देऊन प्रा. डॉ. चंद्रशेखर वाणी यांचे अभिनंदन केले. त्यांच्या निवडीबद्दल महामंत्री प्रा.डॉ.वैभव नरवडे, महाराष्ट्र प्रदेश मिडिया प्रकोष्ठ चे प्रसिद्धी प्रमुख प्रा.सुभाष आठवले, प्रा.दिनेश खेडकर, धुळे एज्युकेशन सोसायटीचे माननीय अध्यक्ष श्री.रविजी बेलपाठक, सचिव श्री. संतोषकुमारजी अग्रवाल, प्राचार्य डॉ.पी.पी.छाजेड, प्रा.डॉ.अविनाश बडगुजर,प्रा.शिवाजी पाटील, डॉ.सुनील बाविस्कर व सर्व एन-मुक्ता सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.








