जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा मराठी विद्या प्रसारक सहकारी समाज या संस्थेच्या वरणगाव येथील महाविद्यालयात प्रा. दिनू पाटील यांच्या प्रभारी प्राचार्य पदाचा प्रस्ताव बोगस असून त्याला मान्यता देऊ नये अशी तक्रार या संस्थेचे संचालक जयवंत भोईटे यांनी विद्यापीठाच्या कुलगुरुंकडे दाखल केली आहे .

या तक्रार निवेदनात जयवंत भोईटे यांनी पुढे म्हटले आहे कि उच्च व तंत्रशिक्षण विभाग मुंबई यांनी जळगांव जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज मर्यादित जळगांव या संस्थेच्या वैध कार्यकारणी बाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत की धर्मदाय उपायुक्त यांच्याकडील सद्यस्थिती परिशिष्ट १ वर असणारी कार्यकारणी वैध समजण्यात यावी . परंतु परिशिष्ट – १ वर नसलेल्या स्वाक्षरीने प्रा. दिनू पाटील यांची बदली करण्यात आली आहे . त्याच स्वाक्षरीने त्यांच्या प्रभारी प्राचार्य पदाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे .आणि त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे . याबाबत मी म. कुलगुरू व प्र कुलगुरू यांच्या कार्यालयात केलेली होती .तरीही त्या तक्रारीची दखल घेण्यात आली नव्हती.
याबाबत आम्ही धर्मादाय उपायुक्तांच्या कार्यलयातून सुद्धा शेवटचा फेरफार अर्ज क्रं. १४५/९८ हा १९९८ – २००२ चां मंजूर असून दिनू पाटील यांच्या नियुक्तीच्या आदेशावर सही करणारी व्यक्तीचे नाव परिशिष्ट – १ वर नाही .
१९९८ -२००२ नंतरचे संचालक मंडळाच्या फेरफारांचे अर्ज न्यायप्रविष्ठ व वादातीत आहेत. या संस्थेच्या संचालक मंडळाची माहिती धर्मादाय उपायुक्तांच्या कार्यालयाकडून मागवून घ्यावी आणि कुलगुरूंनी त्याची पडताळणी करून घ्यावी अन्यथा आम्हाला फौजदारी कारवाईचा विचार करावा लागेल. आजही दिनू पाटील या संस्थेच्या जळगावच्या महाविद्यालयाचे कर्मचारी आहेत कारण आम्ही तक्रार दिल्याने त्यांच्या बदलीला उच्चं शिक्षण सहसंचालकांनी मान्यता दिलेली नाही त्यांचे वेतन जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयातून काढण्यात येते त्यांचा प्रभारी प्राचार्य पदाचा प्रस्ताव पाठवताना पाठवलेली सेवा ज्येष्ठता यादीही बोगस असून त्यावरून कुलगुरुंची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. विशेष बाब म्हणजे सन २०१७ च्या विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत याच संस्थेचे वैध कार्यकारणी बाबत फेरफार अर्ज वादातीत व न्याय प्रविष्ट असल्याने मा. कुलगुरूंनी प्रस्ताव फेटाळले होते.






