मुंबई (वृत्तसंस्था)- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे (CBI) देण्यात आल्यानंतर पुन्हा नव्याने चक्र फिरू लागली आहेत. सीबीआयची एक टीम शनिवारी मुंबईत दाखल झाली. दुसरीकडे शनिवारी सुशांतचा 7 पानांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. यात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पाच डॉक्टरांच्या टीमने हा रिपोर्ट लिहिला आहे. रिपोर्टनुसार, सुशांतच्या गळ्यावर 33 सेमी खोल एक खूण होती. त्याची जीभ बाहेर नव्हती आली. दात ठीक होते, शरीरावर कोणतीही जखम किंवा खूण नव्हती. रिपोर्टनुसार, सुशांतच्या पापण्या अर्धवट उघडल्या होत्या. शरीरातील कोणतीही हाडं तुटली किंवा मोडलेली नव्हती.
वकिलांनी उपस्थित केले प्रश्न
रिपोर्टनुसार, तोंडातून किंवा कानातून फेस अथवा रक्त बाहेर आले नव्हते. मात्र मानेच्या खाली 33 सेंटीमीटर लांब एक खूण होती. दोरीची खूण हनुवटीच्या खाली 8 सेंमी होती. या रिपोर्टनंतर सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी पुन्हा या रिपोर्टवर प्रश्न उपस्थित केले आहेत.







