जळगाव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात 616 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहे. त्यात हॉट जळगाव शहरात सर्वाधिक 101 रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यातील बाधीतांची संख्या 21 हजार 713 वर पोहोचली आहे.

असे आढळून आले रुग्ण
जळगाव शहर-१०१; जळगाव ग्रामीण-३४; भुसावळ-३०; अमळनेर-४२; चोपडा-८६; पाचोरा-३६; भडगाव-३९; धरणगाव-२८; यावल-१४; एरंडोल-९; जामनेर-३६; रावेर-३०; पारोळा-५२; चाळीसगाव-६५; मुक्ताईनगर-१; बोदवड-११ व दुसर्या जिल्ह्यांमधील २ असे एकुण ६१६ रूग्ण आढळून आले आहेत.
आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या २१७१३ इतकी झालेली आहे. यातील १४९४५ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ४०२ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज ५ मृत्यू झाले असून मृतांचा आकडा ७१८ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ६०५० रूग्णांवर उपचार सुरू आहेत.







