यावल (प्रतिनिधी)- कोरोना विषाणु महामारीच्या पार्श्वभुमिवर यावल शहरासह तालुक्यात साजरा होत असलेल्या श्री गणेश उत्सव व दि. ३० / ०८ / २०२० रोजी साजरा होणारा मोहरम उत्सवात कायदा व सुवेवस्थेच्या दृष्टीने यावल पोलिस, केन्द्रिय राखीव दल ( रॅपीड अॅक्यशॅन फोर्स ) व होमगार्ड यांचे वतीने सोमवार दि. २३ / ०८ / २०२० रविवार रोजी सकाळी यावल शहरासह तालुक्यातील साखळी , किनगाव या ठिकाणी पथ संचलन करण्यात आले.

या पथ संचलनात केद्रिय राखीव दलाच्या बटालिनच्या १०० जवानांन सह रॅपीड अॅक्यशॅन फोर्सचे डि.वाय.एस.पी. निलेश वर्मा, यावल प्रभारी पोलिस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण , पोलिस उप निरिक्षक जितेंद्र खैरनार , पोलिस उप निरिक्षक विनोद खांडबहाले , सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी, पो.कॉ सुनिल घुगे, होमगार्ड पलटन नायक पंकज फिरके, पो.कॉ सुनिल घुगे सह पोलिस व होमगार्ड कर्मचारी सहभागी झाले होते.








