हैद्राबाद (वृत्तसंस्था)- तेलंगण येथील श्रीशैलम धरणावरील किनाऱ्यावर असणाऱ्या भूमिगत हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमध्ये मोठा स्फोट झाला आहे. शॉर्ट सर्किटमुळे स्फोट झाल्याची माहिती मिळत असून गुरुवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

माहितीनुसार, भूमिगत पॉवर प्लांटमध्ये सहा पॉवर जनरेटर आहेत. चौथ्या पॅनेलमध्ये ही आग लागली. यावेळी जवळपास १७ कर्मचारी काम करत होते. आतापर्यंत १० जणांची सुटका करण्यात आली असून ८ जण अद्याप बेपत्ता आहेत.
दरम्यान, पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान आगीच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर झाला असून वीज गेल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण होत होता.







