• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लॉकडाऊन काळात नोकरी गमावलेल्यांना सरकार देणार 50 टक्‍के पगार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 21, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- करोनामुळे देशात तीन महिने पुर्णपणे लॉकडाऊन होता. त्यातच काहींना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. अशाच नोकऱ्या गमावणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कामगारांना मिळणाऱ्या बेरोजगार भत्त्यासाठी केंद्राकडून नियम शिथील करण्यात आले आहेत. करोना काळात नोकरी गेलेल्यांसाठी बेरोजगार भत्ता म्हणून तीन महिन्यांचा 50 टक्के पगार दिला जाणार आहे. पण ही सुविधा फक्त कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे सदस्य असणाऱ्या कामगारांनाच मिळणार आहे. दरम्यान, नोकरी गेलेल्या हजारो कामगारांसाठी केंद्र सरकारचा हा दिलासादायक निर्णय ठरणार आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने औद्योगिक कामगारांना फटका बसला होता मात्र, सरकारच्या निर्णयाने कामगारांना दिलासा मिळणार आहे. करोनाचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या कामगारांना आर्थिक मदत केली जावी अशी मागणी वारंवार होत होती. दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि नीती आयोगाने नियम शिथील करण्याची मागणी केली होती.

लॉकडाउन जाहीर झाल्यापासून म्हणजेच 24 मार्च ते 31 डिसेंबपर्यंतच्या कालावधीत कर्मचारी तीन महिन्यांच्या ( 90 दिवस) 50 टक्के पगारावर दावा करण्यास पात्र असणार आहेत. मात्र यासाठी ते किमान दोन वर्षांसाठी (एप्रिल ते मार्च) कर्मचारी राज्य विमा योजनेशी जोडलेले असणं अनिवार्य आहे. याशिवाय 1 ऑक्‍टोबर 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत किमान 78 दिवसांसाठी त्यांनी योगदान दिलेले असले पाहिजे.

तीन महिन्यांच्या 50 टक्के पगारावर कर्मचारी दावा करु शकतात. आधी ही मर्यादा 25 टक्के होती. याशिवाय अजून एका नियमात बदल करण्यात आला आहे. आधी बेरोजगार झाल्यानंतर 90 दिवसांनंतर याचा फायदा घेतला जाऊ शकत होता. पण आता ही मर्यादा कमी करत 30 दिवसांवर आली आहे. कामगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी ही माहिती दिली आहे. राज्य विमा महामंडळाचे तसेच भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य असणाऱ्या व्ही.राधाकृष्णन यांनी सरकारच्या या निर्णयामुळे 30 ते 35 लाख कामगारांना फायदा मिळणार असून नोकरी गेलेल्यांना दिलासा मिळेल असे म्हटले आहे. जे कामगार एका मर्यादेपर्यंतच कमाई करु शकतात त्यांच्यासाठी कर्मचारी राज्य विमा योजना उपलब्ध आहे. ज्या फॅक्‍टरीमध्ये 10 पेक्षा जास्त कामगार असतात तिथे ही योजना लागू होत नाही. तसेच पगार 21 हजारांपर्यंत असेल तरच योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेत देशातील 3.5 कोटी कुटुंब सहभागी आहेत. यामुळे जवळपास 13.5 कोटी लोकांना रोख रक्कम आणि वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळतो.


 

 

Previous Post

जळगाव अँजल फूड फाऊंडेशनतर्फे छायाचित्रकारांचा गौरव !

Next Post

तेलंगणमधील भूमिगत पॉवर प्लाटंमध्ये स्फोट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तेलंगणमधील भूमिगत पॉवर प्लाटंमध्ये स्फोट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
मुक्ताईनगरात ट्रकमधून ३४० लिटर डिझेल चोरी; ३४ हजारांचे नुकसान
Uncategorized

मुक्ताईनगरात ट्रकमधून ३४० लिटर डिझेल चोरी; ३४ हजारांचे नुकसान

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon