प्रमोद अण्णा वाणी यांची भारतीय जनता पार्टीच्या जळगाव जिल्हा महानगर ऑटो रिक्षा स्कूल व्हॅन आघाडी च्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन जळगावचे संस्थापक उपाध्यक्ष तथा – महाराष्ट्र राज्य चालक मालक विद्यार्थी वाहतुक संघटना जळगाव कार्याध्यक्ष प्रमोद वाणी यांची भारतीय जनता पार्टीच्या जळगाव जिल्हा महानगर ऑटो रिक्षा स्कूल व्हॅन आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी नियुक्ती केली.

प्रमोद भाऊ वाणी ऑटोरिक्षा व शालेय विद्यार्थी वाहतुक स्कूल व्हॅन चालक मालक यांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्न करतात त्यांचे संघटन करुन त्यांच्या समस्या. अडी- अडचणी सोडविण्यासाठी नेहमी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कार्य करीत आहेत आता पर्यंत त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणूनच पक्षाने माजी मंत्री आमदार मा. गिरीषभाऊ महाजन माजी मंत्री मा. एकनाथराव खडसे, उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटन मंञी अॅड. किशोरजी काळकर, जिल्हाध्यक्ष आमदार मा. सुरेश भोळे ( राजु मामा ), खासदार मा.रक्षाताई खडसे, खासदार मा. उन्मेष दादा पाटील, आमदार मा. चंदूभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाने भविष्यात जळगाव जिल्ह्य़ात ऑटोरिक्षा. स्कूल व्हॅन आघाडी समितीचे जास्तीत जास्त गठन करण्यासाठी मा. प्रमोद भाऊ वाणी यांची नियुक्ती करण्यात आली.
आमदार मा. राजु मामा भोळे साहेब यांच्या हस्ते नियुक्ती पञ देण्यात आले, यावेळी जिल्हाध्यक्ष दिपक भाऊ सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस विशाल भाऊ ञिपाठी, महेश जोशी जिल्हा चिटणीस राहूल वाघ, विधान सभा क्षेत्र प्रमुख दिपक साखरे, मंडळ अध्यक्ष शक्ती महाजन, नगर सेवक किशोर बाविस्कर, रिक्षा चालकांचे नेते मा. प्रल्हादराव सोनवणे, शालेय विद्यार्थी वाहतुक संघटनाचे अध्यक्ष विनोद कुमावत, महाराष्ट्र राज्य चालक मालक विद्यार्थी वाहतुक संघटनाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील, स्कूल व्हॅन असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष भरत वाघ, विजय अहिरराव, नाना भोई, सुनील वाणी, ताराचंद पाटील, पद्माकर पाटील, गंभीर तडवी, प्रदीप बयास, प्रभाकर तायडे व ऑटोरिक्षा. स्कूल व्हॅन .विद्यार्थी वाहतुक चालक मालक व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रमोद भाऊ वाणी यांचे हार्दिक अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या, त्यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे ,
भरत वाघ
सरचिटणीस
महाराष्ट्र राज्य चालक मालक विद्यार्थी वाहतुक संघटना जळगाव







