जळगाव (प्रतिनिधी) – शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून बऱ्याच वेळा अँटीजन टेस्ट किटचा तुटवडा निर्माण होत आहे. जळगाव मनपाला अँटीजन टेस्ट किट देण्यासाठी राज्यातील काही मान्यवरांना महापौर सौ.भारती सोनवणे यांनी विनंतीपत्र पाठविले असता मुंबई विधानपरिषद सदस्य आ.रमेश पाटील यांनी ८ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
जळगाव शहरातील नागरिकांची कोरोना तपासणी तात्काळ होण्यासाठी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी शासन आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करून अँटीजन टेस्ट किट उपलब्ध करून घेतल्या होत्या. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अँटीजन टेस्ट किटचा तुटवडा भासू लागला. नागरिकांची तात्काळ तपासणी होण्याकामी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी राज्यातील काही मान्यवरांना पत्र पाठवून अँटीजन टेस्ट किट उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली होती. तसेच मनपा फंडातून देखील अँटीजन किट खरेदी करण्यासाठी आयुक्तांना पत्र दिले होते.







