एरंडोल (प्रतिनिधी)- पोळा हा सण शेतकर्यांसाठी वर्षातील सर्वात मोठा व महत्वाचा असतो. यात शेतकरी हे आपला विश्वासू साथीदार असणार्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करत असतात. खान्देशातील प्रत्येक गावात पोळा साजरा करण्यात येतो. यात काही गावांमध्ये पोळ्याच्या दिवशी विविध प्रथा तयार झाल्या आहे. कोरोनामुळे पोळा यंदा पहिल्यांदाच रद्द करण्यात आला आहे. परंतु सोशल डिस्टिंगचे पालन करून व मास्क लावून एरंडोल कोविंड सेंटर मध्ये पोळा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
काल पोळा सणाचे औचित्य साधून कोरोनाबाधित रुग्णांना पोळा सण आनंदात साजरा करता यावा म्हणून एरंडोल कोविंड सेंटर मध्ये पुरणपोळीचे गोडधोड जेवण देण्यात आले. प्रांताधिकारी विनय गोसावी साहेब यांनी स्वतः जेवण वाढून शुभेच्छा दिल्या. सोबत डॉ फिरोज शेख व कर्मचारी उपस्थित होते.







