अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे.

अमळनेर तालुक्यात पहिल्या टप्प्यात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले होते. तर मध्यंतरी मात्र रूग्ण संख्या ही घटली होती. तथापि, अलीकडच्या काही काळात रूग्ण संख्या पुन्हा एकदाचे वाढली असून यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे.
अमळनेर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी आलेल्या रिपोर्टनुसार एकाच दिवशी ७८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यातील ५३ हे शहरी भागातील आहेत. दरम्यान, यामुळे तालुक्यातील आजवरच्या रूग्णांचा आकडा हा तेराशेच्या पलीकडे गेला आहे.







