मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – आज दिनांक 15 ऑगस्ट 2020 रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त निमखेडी बु!! गावात तापी पूर्णा फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात तापी पूर्णा फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ माधुरी संतोष झंनके यांच्या परिश्रमातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

या कार्यक्रमाला गावातील महिला सरपंच सौ. शशिकला हिरालाल कांडेलकर मुक्ताईनगर पंचायत समिती माजी सदस्या सौ रंजनाताई कांडेलकर, सौ.शारदा प्रमोद सोनार, माजी सरपंच सौ.सविता शेषराव कांडेलकर, सौ.शारदा प्रमोद पाटील, सौ. प्रमिला युवराज मुंडे गावातील महिला बचत गटाच्या अध्यक्ष सचिव यांच्या माध्यमातून व यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले सदर कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती, संपूर्ण भारत देशामध्ये कोरोणा सारख्या महामारी संकटा च्या काळात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रम विशेष म्हणजे बुद्ध विहार परिसरामध्ये वृक्ष लावून निसर्गरम्य वातावरण निर्माण व्हावं हा उद्देश तापी पूर्णा फाउंडेशनच्या होता या कार्यक्रमामध्ये महिलांचा सहभाग असल्यामुळे कार्यक्रम विशिष्ट पद्धतीने पार पडला या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून श्री दीपक इंगळे व संतोष धनके यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाला संस्थेचे सचिव म्हणून मिलिंद पानपाटील उपस्थित होते.







