• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हवाला रॅकेट चालवणाऱ्या चीनी नागरिकाला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 13, 2020
in भारत, विश्व
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – प्राप्तीकर खात्याने बनावट चीनी कंपनीच्या कागदपत्रांच्या आधारे भारतात एक हजार कोटी रुपयांचे हवाला रॅकेट चालवणाऱ्या लुओ संग या चीनी नागरिकाला मंगळवारी रात्री अटक केली. त्याला 2018 मध्ये हेरगिरीच्या संशयावरून दिल्ली पोलिसांनी अटक केली असल्याची नवी माहिती उघड होत आहे.

चार्ली पेंग उर्फ लुओ संग हा चीनसाठी हेरगिरी करत असल्याचा आणि मनी लॉंडरींग करत असल्याचा तसेच हवाला व्यवहार करत असल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर 2018 मध्ये ठेवला होता. मात्र त्याला न्यायलयाने पुरेशा पुराव्याअभावी सोडून दिले होते.

मनिलॉंडरिंग प्रकरणात चीनी सहभाग असल्याची विश्‍वासनीय माहिती मिळाल्याने प्राप्तीकर विभागाने मंगळवारी एकाचवेळी दिल्ली, गझीयाबाद आणि गुरगावात 21 ठिकाणी छापे घातले. त्या छाप्यात लुओ संग याचे नाव पुढे आले. त्याला या छाप्यात अटक करण्यात आली.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, लुओ संग याची आठ ते दहा बॅंक खाती होती. त्यातून बनावट चीनी कंपन्यांच्या नावाने 300 कोटी रुपयांचे हवाला व्यवहार केले होते. रोज तीन कोटी रुपयांचे हवाला व्यवहार करत असे. त्याच्याकडे 40 बॅंक खाती बंधन बॅंक आणि आयसीआयसीआय बॅंकेच्या काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हवाला व्यवहार जात असे. त्या बॅंक कर्मचाऱ्यांवर छापे टाकण्यात आले आहेत. हा सर्व घोटाळा सुमारे एक हजार कोटीचा असावा, अशी शक्‍यता आहे.

गेली तीन वर्ष हे रॅकेट तो चालवत असल्याच संशय आहे. तो आपला पत्ताही वारंवार बदलत असे. या परदेशी हवाला व्यवहारात हॉंगकॉंग आणि अमेरिकन डॉलर्सचा समावेश आहे. या चीनी नागरिकाच्या खात्यांशिवाय बनावट संस्थांच्या नावाने 40 बॅंक खाती उघडण्यात आली होती. त्यांच्याद्वारे 100 कोटी रुपयांचे कर्ज एका वेळी घेत होता, असे तपासात आढळून आले आहे. या रॅकेटमध्ये बॅंक कर्मचारी आणि चार्टर्ड अकौंटंटचाही सक्रिय सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

संगच्या ताब्यातून दोन बनावट आधार कार्ड आणि एक बनावट पॅनकार्ड जप्त करण्यात आले आहे. पहिले आधार काड दिल्लीतील तर दुसरे आधार कार्ड मणीपुरच्या पत्त्यावरचे होते. हे दोन्ही चार्ली पेंग या नावाने आहेत. मात्र या 40 वर्षीय चीनी नागरिकाचे खरे नाव लुओ संग असे आहे. तो ल्हासा येथील नागरिक आहे., सध्या तो हरीयाणातील गुडगाव येथे रहात आहे.

लुओ संगने भारतीय पासपोर्ट मिळवण्यासाठी भारतीय मुलीशी विवाह केला होता. त्याची पत्नी मिझोरामची रहिवाशी आहे. तपास यंत्रणांनी तिचाही पासपोर्ट जप्त केला आहे.


 

 

Previous Post

भारतीय वंशाच्या कमला देवी हॅरिस डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपाध्यक्षपदी

Next Post

धनगर समाजाची जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

धनगर समाजाची जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

बालमजुरीचा पर्दाफाश; दोन गॅरेज चालकांवर गुन्हे

June 12, 2026
कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या
1xbet russia

कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या

June 12, 2026
अंमली पदार्थविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण
1xbet russia

अंमली पदार्थविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण

June 12, 2026
भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक
1xbet russia

पिंपरखेड मारुती मंदिर चोरीचा उलगडा; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत

June 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

बालमजुरीचा पर्दाफाश; दोन गॅरेज चालकांवर गुन्हे

June 12, 2026
कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या

कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon