भडगाव (प्रतिनिधी) – ऑल इंडिया केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोशियन अध्यक्ष जगन्नाथ शिंदे फार्मसी स्टुडंट कौन्सिल चे महाराष्ट्र अध्यक्ष भूषण भदाणे यांच्या मार्गदर्शनाने फार्मसी स्टुडंट कौन्सिलचे जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांनी जळगाव जिल्हा सचिव पदी प्रतीक यशवंत पाटील भडगाव यांची नियुक्ती केली आहे. आपल्या जवळीक फार्मसीच्या विदयार्थ्यांच्या अडचनी सोडवण्यासाठी ही निवड करण्यात आली असून नियुक्ती पत्र देण्यात आले. या निवडीमुळे प्रतीक पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.