अमळनेर : तालुक्यातील लोण सिम या गावातील विहिरीवर पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेली असता रेशमा आबा धनगर (वय ४०) हिचा पाय घसरुन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनास्थळी राहुल फुला सपोनि यांनी भेट दिली. रेश्मा धनगर ही पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेली असता तिचा पाय घसरुन पडल्याने मृत्यू झाल्याबाबत बाबू सहादू व्हडगर यांनी पोलिसात माहिती दिली. यावरून आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तिच्या पश्चात पती, एक मुलगा, चार मुली असा परिवार आहे. तपास राहुल फुला यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.विशाल चव्हाण, पोहका. प्रकाश साळुंखे, पो.ना.कुळकर्णी दिनेश हे करीत आहेत.