यावल (प्रतिनिधी) – शहरातील खडकाई नदीपात्रात उघडयावर टाकत असलेला घनकचरा टाकणे बंद करावे असे मागणीचे निवेदन युवासेना तर्फे दि. ११ मंगळावार रोजी नगरपालिका मुख्याधिकारी बबन तडवी यांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करून देण्यात आले.
दिलेल्या निवेदना नुसार यावल शहरातुन नगरपालिका संपुर्ण घनकचरा संकलिक करून शहरातुन जाणारी खडकाई नदीच्या पात्रात उघडयावर टाकलाजात आहे. ज्या नदीपात्रात घनकचरा टाकला जात आहे तेथुन नागरिक वस्ती आहे. त्याच बरोबर शाळा सुध्दा आहे. त्यामुळे येथे रोगराई पसरण्यात कारणीभुत ठरत आहे. सदर नगरपालिकाचे कचरा संकलन व टाकण्यासाठी डम्पिंग ग्राउंड आरक्षित आहे. तरी सदरील कचरा नदीपात्रात उघडयावर टाकला जात आहे आणि आता पावसाळयाचे दिवस असल्याने रोगराही पसरत जाईल. तरी न.पा. यावल यांनी सदरील बाब लक्षात घेवून तत्काळ कारवाई करावी. अन्यथा आंदोलन होण्यात येईल. असे मागणीचे निवेदन युवासेना तर्फे दि.११ मंगळावार रोजी नगरपालिका मुख्याधिकारी बबन तडवी यांना देण्यात आले. या निवेदना मुख्याधिकारी बबन तडवी यांनी स्पष्टीकरण दिले की डम्पिंग ग्राउंड वर पत्र्याचे शेड उभारण्याचे काम चालू असल्यामुळे घनकचरा डम्पिंग ग्राउंड घनकचरा टाकता येत नाहीये तरी येत्या १५ दिवसात घनकचऱ्याची डम्पिंग बाबतची अडचण सुटेल.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे , शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले , शिवसेना आदिवासी सेल तालुका प्रमुख हुसेन तडवी , युवासेना शहर अधिकारी सागर देवांग , युवासेना तालुका सरचिटणिस सचिन कोळी , अल्पसंख्यांक तालुका संघटक अजहर खाटीक , युवासेना शहर समन्वयक सागर बोरसे , युवासेना शहर सरचिटणीस विजय पंडित , शिवसेना विभाग प्रमुख योगेश पाटील, सुरेश कुंभार सह शिवसेना , युवासेना व आदिवासी सेल पदाधिकारी , कार्यकर्ते यांची स्वाक्षरी व उपस्थित होते.







