यावल (प्रतिनिधी)- शहरातुन नगरपालिका घनकचरा संकलित करून शहराच्या बाहेर तयार केलेल्या कचरा डम्पिंग ग्राउंड वर टाकण्यात येतो . नंतर त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येते पण गेल्या काही महिन्यापासुन शहरातुन संकलित होणारा घनकचरा शहरातुन जाणाऱ्या खडकाई नदीच्या पात्रात टाकण्यात येत आहे यामुळे नदी पात्र प्रदूषित होत आहे.
सध्या कोरोना विषाणू प्रादुर्भाव लक्षात घेता खडकाई नदीला पुर आल्यानंतर हा कचरा पुराने वाहत जावुन नदीकाठावर राहणाऱ्या नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.
नगराध्यक्ष , नगरसेवक , मुख्यधिकारी व यावल नगरपालिका प्रशासन यांनी तात्काळ दखल घेवुन नदीपात्रात टाकला जाणारा घनकचरा हा डम्पिंग ग्राउंड वरच संकलित होईल याची काळजी घ्यावी. नदीपात्र स्वच्छ राहील यांची काळजी नगर पालिका प्रशासनाने घ्यावी अशी मागणी होत आहे.








