पारोळा (प्रतिनिधी) – शिरसमणी ता,पारोळा येथील 29 वर्षीय युवकाने स्वत: च्या शेतात काहीतरी विषारी पदार्थ सेवन करुन आत्महत्या केल्याची घटना दि 6 रोजी दुपारच्या सुमारास घडली.


याबाबत मिळालेल्या माहीतीनुसार आरीफ मुसा पिंजारी (वय 29 ) हा दुपारी बारा वाजेच्या सुमारास शेतात काम करित असतांना त्याने शेतातच काहीतरी विषारी पदार्थ सेवन केल्याचे समजले असता यावेळी शरीफ पिंजारी,मुसा पिंजारी,साहेबराव पिंजारी यांनी खाजगी वाहनाने उपचारासाठी आरीफ यास कुटीर रुग्णालय येथे दाखल केले असता डाँक्टरांनी तपासुन दुपारी पावणेतीन वाजता मयत घोषित केले. ।दरम्यान आत्महत्येचे कारण समजु शकले.यावेळी रमजान सिकंदर पिंजारी रा.शिरसमणी यांच्या खबरीवरुन पारोळा पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात येवुन तपास हवलदार जयवंत पाटील हे करित आहे.







