जळगाव (प्रतिनिधी) – वर्तमान शिक्षण पद्धती हि ज्ञानावर आधारित आहे यात कौशल्याचा अभाव आहेच. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असली तरी कौशल्याच्या अभावाने काही प्रमाणत विद्यार्थी सोडले तर शेकडा पंच्याहत्तर टक्केंमधे उद्योगांबद्दल कोणत्याही प्रकारची जागरूकता नसल्याने मोठ्या प्रमाणावर अनास्था दिसून येते. त्यामुळे बेरोजगारीत वाढ होते आहे. अश्या परिस्थितीत नवे शैक्षणिक धोरण हे 34 वर्षानंतर विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाकडून व्यवसायिक शिक्षणाकडे नेणारे असणार आहे. व साधारणता: २०२२-२३ पासून अपेक्षित टप्पांवर बदलत जाणारे आहे. प्रामुख्याने इयत्ता पाचवी पर्यंतचे शिक्षण मातृ भाषेतून किवां प्रादेशिक भाषेतून देण्यात प्राधान्य असल्याने – प्रादेशिक भाषांचा विकास होईल .सहावी पासून व्होकेशनल अभ्यासक्रम शिकता येणार आहे. जसे कारपेंटर , लॉन्ड्री, क्राफ्ट अशा विषयासाठी इटर्नशिप करता येईल. शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्यांना इयत्ता १२ वी नंतर ४ वर्षाचा बी.एड. बहु शाखीय शैक्षणिक अभ्यासक्रम करावा लागेल. शिवाय विषयांचे वैविध्य पण असेल विविध विषय निवडण्याची संधी असणार आहे. विज्ञान शिकताना संगीत, बेकरी स्पोर्ट्स, लोककला हे अभ्यासाचे विषय म्हणून निवडता येणार आहे.
नवे शैक्षणिक धोरण क्रांतीकारक आहे. यात दुमत नाही हा शैक्षणिक मसुदा तयार करण्याआधी शिक्षणप्रेमी शिक्षणतज्ञ, आणि जनता सर्वांकडून सूचना मागविल्या, खुल्या कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण बेरोजगारी कमी करण्यासाठी, देशाच्या विकासासाठी, वेगाने बदलत असलेल्या जागतिक आर्थिक रचना आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संधी यांना तत्परतेने प्रतिसाद देणारे धोरण असल्याने याकडे विकसनशील या दृष्टीने बघण्याची गरज असून ते स्वागताहर्य आहे. असे जळगाव म. भाजपा शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण जाधव यांनी सांगितले.







