मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरणे म्हणजे

सूर्यावर थुंकण्यासारखे…विकृत वृत्तीचा जाहीर निषेध
जळगाव (प्रतिनिधी) – काल चाळीसगाव येथे दुधात मिठाचा खडा टाकण्याचे आंदोलन भाजपच्या वतीने करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांना संबोधताना चाळीसगावचे कर्तव्यशून्य आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरला, जळगाव जिल्हा एन एस यु आय च्या वतीने व महा विकास आघाडी सरकारमधील काँग्रेस घटक पक्षाच्यावतीने अशा विकृत मनोवृत्तीच्या आमदाराचा जाहीर निषेध जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केला.
माजी मंत्र्यांची केली सालदारकी, तेव्हा मिळाली आमदार की…..
आमदार मंगेश चव्हाण यांचे चाळीसगाव तालुक्यात कुठलेही कार्य नसताना केवळ आणि केवळ माजी मंत्री गिरीश महाजन यांची चापलुसी करत व एक प्रकारची सालदारकी करत चाळीसगाव विधानसभेची आमदारकी त्यांनी मिळवली.
कुठलाही राजकीय अनुभव नसताना सामाजिक क्षेत्रांमध्ये कुठल्याही प्रकारचे काम नसताना केवळ आणि केवळ पैशाच्या व बळाच्या जोरावर भाजप पक्षाचे तिकीट मिळवत आमदारकी मिळवली.
त्यामुळे अशा कर्तृत्वशुन्य आमदाराला कर्तुत्ववान मुख्यमंत्र्यांचे कार्य कधीही समजणार नाही.
उद्धव ठाकरे हे केवळ शिवसेनेचे नव्हे तर महा विकास आघाडी सरकारचे व या राज्याचे मुख्यमंत्री आहेत अशा या घटनात्मक प्रमुख पदावरील कर्तुत्ववान मुख्यमंत्री बद्दल अपशब्द काढणे एक प्रकारचा त्यांचा अपमानच होय. त्यामुळे त्यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या आमदार मंगेश चव्हाण यांचा व अशा विकत मनोरुत्तीचा जळगाव जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करीत असल्याचे मराठे यांनी म्हटले आहे .
मला मुख्यमंत्री ठाकरे यांचा फोन आला…..
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांची काळजी घेण्याबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या विधानसभा व विधान परिषदेचे मधील सर्व सदस्यांची सुद्धा विचारपूस करण्यासाठी सर्व आमदारांना प्रत्यक्ष फोन लावून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून काळजी घेण्याचा सल्ला सुद्धा दिला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षभेद न बघता राज्यातील सर्व आमदारांना फोन करत चाळीसगाव विधानसभेचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांना सुद्धा फोन करून त्यांच्या तब्येतीची, कुटुंबाची आस्थेने विचारपूस करुन ,स्वतःची काळजी घेऊन लोकांमध्ये जाऊन काम करण्याचा सल्ला सुद्धा दिला होता.
त्यावेळेस सोशल मीडियावरती स्वतः आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी केलेल्या संवादाची रेकॉर्डिंग फिरवली व मला मुख्यमंत्री ठाकरे यांचा फोन आला… असे सांगून मोठेपण मिळवण्याचा प्रयत्न केला व ते संपूर्ण जिल्ह्याने बघितले.
त्यामुळे अशा अजातशत्रू, कर्तुत्ववान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्य राज्यातील जनतेला चांगल्याप्रकारे माहिती आहे.
राज्यातील संपूर्ण जनता खंबीरपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी उद्धव ठाकरे यांच्या बद्दल बोलणे म्हणजेच “सूर्यावर थुंकण्यासारखे आहे”.. म्हणजेच थुंकल्यानंतर ते परत त्यांच्या तोंडावरती पडेल… त्यामुळे आमदार साहेब *घरातच रहा.. सुरक्षित रहा.. व शांत रहा..! , असा आमचा त्यांना सल्ला आहे







