नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज दुपारी 1 वाजता दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे हॉस्पिटलच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष डॉ. डी. एस. राणा यांनी सांगितले.

30 जुलै रोजी संध्याकाळी सोनिया गांधी यांना या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, असे हॉस्पिटलच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले आहे.
सोनिया गांधी यांना नियमित तपासणी आणि चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले होते, असेही हॉस्पिटलने स्पष्ट केले आहे.







