• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भारतीय लष्कर हिवाळ्यातही पूर्व लडाखमध्ये राहणार सज्ज

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 2, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पूर्व लडाखमधील सीमेवर चीनबरोबर निर्माण झालेला तणाव इतक्‍यात दूर होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे त्या भागात हिवाळ्यातही सज्ज राहण्याचे भारतीय लष्कराने ठरवले आहे. त्यातून सध्या तिथे तैनात असलेले जवान, रणगाडे आणि शस्त्रास्त्रे जैसे थे ठेवण्यात येणार आहेत.

पूर्ण सैन्यमाघारीची तयारी चीनने बऱ्याचदा दर्शवली. प्रत्यक्षात तसे घडले नसल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे चीनवर दबाव निर्माण करण्याची रणनीती भारताने आखली आहे. पूर्व लडाख हा पर्वतमय भाग आहे. अतिशय उंचावर असल्याने तिथे थंडीची तीव्रता प्रचंड असते.

हिवाळ्यात तेथील तापमान उणे 20 अंशापर्यंत खाली जाते. त्या स्थितीत जवानांची आणि शस्त्रास्त्रांची तैनाती कायम ठेवण्याचे मोठे आव्हान असते. त्यासाठी लागणारी व्यापक तयारी भारतीय लष्कराने आतापासूनच सुरू केली आहे.

हिवाळ्यासाठी लागणारे विशेष कपडे आणि आवश्‍यक सामग्रीच्या खरेदीसाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले आहे. भारतीय हवाई दलालाही हाय अलर्टवर ठेवले जाणार आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेच्या (एलएसी) लगत असणाऱ्या हवाई तळांवर आवश्‍यक ती सज्जता ठेवली जाणार आहे. त्याशिवाय, भारतीय नौदल हिंद महासागर विभागात दक्ष राहणार आहे.

चीनी कुरापतींमुळे एलएसीलगत मागील काही दिवसांपासून तणावाची स्थिती आहे. ती स्थिती निवळावी यासाठी भारत आणि चीनमध्ये लष्करी आणि राजनैतिक पातळ्यांवर विविध बैठका झाल्या. त्या बैठकांमध्ये पूर्ण सैन्यमाघारीला तयार असल्याचे चीनकडून दाखवण्यात आले.

गलवान खोरे आणि इतर काही भागांतून चीनने सैन्य मागेही घेतले. मात्र, पेंगॉंग त्सोमधील काही भागांतून चीनी सैन्य अजून हटलेले नाही. चीनने पूर्णपणे सैन्य मागे घ्यावे, अशी ठाम भूमिका भारताने घेतली आहे. आता दोन्ही देशांमध्ये लष्करी पातळीवर चर्चेची आणखी एक फेरी लवकरच होण्याची शक्‍यता आहे.


 

 

Previous Post

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक

Next Post

महसूल दिनानिमित्त न्हावी येथिल तलाठी लीना राणे यांचा सत्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महसूल दिनानिमित्त न्हावी येथिल तलाठी लीना राणे यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतरजिल्हा शस्त्रतस्कर टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक
1xbet russia

आंतरजिल्हा शस्त्रतस्कर टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

July 3, 2026
उसाच्या पैशांच्या वादातून अपहरण; मारहाण करून जबरदस्तीने चेकवर घेतल्या सह्या
1xbet russia

उसाच्या पैशांच्या वादातून अपहरण; मारहाण करून जबरदस्तीने चेकवर घेतल्या सह्या

July 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

शेतातील मोटार व सोलरच्या वायरी चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपी अटकेत

July 3, 2026
अबब! कपाट उघडताच एसीबीही चक्रावली; मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरातून २.९४ कोटींचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

अबब! कपाट उघडताच एसीबीही चक्रावली; मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरातून २.९४ कोटींचा मुद्देमाल जप्त

July 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतरजिल्हा शस्त्रतस्कर टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

आंतरजिल्हा शस्त्रतस्कर टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

July 3, 2026
उसाच्या पैशांच्या वादातून अपहरण; मारहाण करून जबरदस्तीने चेकवर घेतल्या सह्या

उसाच्या पैशांच्या वादातून अपहरण; मारहाण करून जबरदस्तीने चेकवर घेतल्या सह्या

July 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon